इतिहास

सारवाडी हे   गाव महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हा कारंजा तालुक्यामधील नॅशनल हायवे न 6 वर वसलेले गाव आहे.  ज्यामध्ये पूर्ण क्षेत्रफळ 827.77 हे लोकसंख्या २५६१ असून ८९० घरे आहेत ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय शेती आहे, गावामधून नॅशनल हायवे नं  6 गेलेल असल्यामुळे गावाला दळणवळण करण्याकरिता सोयीस्कर होते. गावामध्ये शिक्षणासाठी 1 ते 8 जिल्हा परिषद शाळा सारवाडी उपलब्ध आहे ज्याला आताच पीमश्री या संकल्पनेतून गौरविण्यात आली आहे. 8 ते 10 पर्यन्त शिक्षणासाठी महात्मा फुले विद्यालय सारवाडी (देववाडी ) उपलब्ध आहेत. गावामध्ये धार्मिक आत्मीयता जोपासण्यासाठी विविध देवस्थाने आणि दर्गा उपलब्ध आहे ज्यातून धार्मिक एकता जोपासल्या जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहेत अशा या गावामध्ये सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.