सरपंचांचा संदेश

गावाकडे चला या महात्मा गांधी यांच्या संदेशाची ग्वाही घेऊन महाराष्ट्र राज्य यांच्या उपक्रम मध्ये सहभाग घेताना सारवाडी ग्रामपंचायात ची सरपंच अस्सलयाबाबत मल अतिशय आनंद होत  आहे. तरी या उपक्रमाच्या आधारे गावातील लोकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून आणि त्याद्वारे नवीन सरकारच्या योजना आणि त्या साठी लागणारे अत्यावश्यक कागदपत्राची सांगड घालण्याची  संधी मला सरपंच या नात्याने मिळाली तरी मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो.

      या द्वारे गावातील विविध क्षेत्र मध्ये प्रगती पंथाची तसेच शासकीय योजनांची माहिती प्रसिद्ध  करता येईल असा एक प्रामाणिक प्रयत्न, तसेच गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी सिंगल विंडो तयार करणे. आणि याद्वारे विशिष्ठ योजना आणि विविध कार्यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग वाढवता येईल हा एक प्रयत्न या द्वारे केला जात आहे.  तरी आपण या मध्ये सहभागी होऊन गावाच्या विकासाकरिता सहभाग द्याल ही नम्र विनंती.

सरपंच,
सारवाडी ग्रामपंचायत